चिपळूण तालुक्यातील एका दुकानामध्ये माल भरण्यासाठी माहेरून २५ हजार रुपये आणण्यास नकार दिल्याच्या कारणावरून पत्नीला शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना सावर्डे कासारवाडी येथे घडली. याप्रकरणी पती उभयचंद आत्माराम मोहिरे (वय ३८, रा. सावर्डे कासारवाडी, ता. चिपळूण) याच्याविरोधात सावर्डे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १५ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास सावर्डे कासारवाडी येथे घडली. याप्रकरणी पल्लवी उभयचंद मोहिरे (वय ३५, व्यवसाय गृहिणी, रा. सावर्डे कासारवाडी) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
फिर्यादी यांचे पती उभयचंद मोहिरे यांनी दुकानामध्ये माल भरण्यासाठी त्यांच्या आईकडून २५ हजार रुपये आणण्यास सांगितले. मात्र, पल्लवी यांनी पैसे आणण्यास नकार दिला. याचा राग आल्याने आरोपीने त्यांना शिवीगाळ केली. तसेच, “तुला मारून टाकेन, पेट्रोल टाकून जाळून टाकेन,” अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
यानंतर आरोपीने पल्लवी यांच्या दोन्ही कानाखाली हाताने मारले. तसेच डोक्यावर ठोशाने मारहाण केली. त्यानंतर लाकडी दांडक्याने त्यांच्या डाव्या कुशीवर आणि उजव्या पायाच्या ढोपरावर मारहाण करून दुखापत केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी सावर्डे पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १२२/२०२६ नुसार १६ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १०.२१ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ११८(१), ११५(२), ३५२ आणि ३५१(२) अन्वये कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास सावर्डे पोलिस करीत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













