Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

रत्नागिरी : नाचणे येथे रिक्षाची दुचाकीला पाठीमागून धडक, तरुणी गंभीर जखमी, पत्नीसह रिक्षाचालकही जखमी

banner 468x60

रत्नागिरी शहरातील नाचणे परिसरात भरधाव रिक्षाने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणी गंभीर जखमी झाली असून, रिक्षाचालक आणि त्यांची पत्नीही जखमी झाले आहेत. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास नाचणे ते नारायणमळी मार्गावर, कोहिनूर एनक्लेव अपार्टमेंटसमोर, नाचणे (ता. जि. रत्नागिरी) येथे हा अपघात झाला.

याप्रकरणी आशिष अरुण घोसाळे (वय ४४, व्यवसाय वकील, रा. घोसाळेवाडी आंबेशेत, रत्नागिरी) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादीनुसार, आरोपी राजेंद्र दत्तात्रय कुर्ते (वय ५३, रा. आंबेशेत कुर्टेवाडी, रत्नागिरी) हे त्यांच्या ताब्यातील रिक्षा क्रमांक एमएच-०८ ई ४१६६ मधून पत्नी श्रुती राजेंद्र कुर्ते यांना घेऊन नाचणे-नारायणमळी मार्गे आंबेशेतकडे जात होते.

यावेळी त्यांनी रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता रिक्षा हयगयीने, अविचाराने आणि भरधाव वेगात चालवली. त्यांच्या पुढे जात असलेल्या सुझुकी अॅक्सेस दुचाकी क्रमांक एमएच-०८ एवाय-३६६६ हिला पाठीमागून जोरदार धडक दिली.

या अपघातात दुचाकी चालवणाऱ्या अन्वी अमेय घोसाळे (वय ३०, रा. घोसाळेवाडी आंबेशेत) यांच्या डोक्याला आणि खांद्याला गंभीर दुखापत झाली. तसेच रिक्षातील श्रुती राजेंद्र कुर्ते (वय ५२) आणि रिक्षाचालक राजेंद्र कुर्ते (वय ५३) यांनाही किरकोळ दुखापती झाल्या आहेत. अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे.

या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २६२/२०२६ दाखल करण्यात आला असून, आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *