रत्नागिरीतील कुवारबाव परिसरात आज सकाळी सुमारे १०.४५ वाजण्याच्या सुमारास तीन डंपरचा विचित्र अपघात झाला. एमआयडीसी रस्त्याकडे जाण्यासाठी थांबलेल्या डंपरला मागून येणाऱ्या डंपरचे अचानक ब्रेक फेल झाल्याने जोरदार धडक बसली. त्यानंतर धडक दिलेला डंपर रिव्हर्समध्ये मागे येत असताना पाठीमागून येणाऱ्या तिसऱ्या डंपरलाही धडकला. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नसून मोठी दुर्घटना टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, कुवारबाव येथे MH 08 DD 7794 क्रमांकाचा डंपर एमआयडीसी रोडकडे जाण्यासाठी थांबला होता. याचवेळी मागून येणाऱ्या MH 08 AP 2637 क्रमांकाच्या डंपरचे अचानक ब्रेक लागले नाहीत. चालक अमीन रेड्डी यांच्या ताब्यातील या डंपरने पुढे थांबलेल्या डंपरला जोरदार धडक दिली.
धडकेनंतर MH 08 AP 2637 हा डंपर रिव्हर्समध्ये मागे येत असताना पाठीमागून येणाऱ्या MH 08 W 2900 क्रमांकाच्या तिसऱ्या डंपरला धडकला. या अपघातात तिन्ही डंपरचे नुकसान झाले.
अपघाताची तीव्रता पाहता कोणालाही दुखापत झाली नसल्याने मोठी दुर्घटना टळली. घटनेनंतर कुवारबाव परिसरात काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













