संगमेश्वर बाजारपेठेत बेकायदेशिरपणे जुगार खेळणार्या 5 जणांविरोधात संगमेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई बुधवार 12 मार्च रोजी दुपारी 3.35 वा. सुमारास करण्यात आली. गौरव शेखर सुर्वे (39), राकेश शिवराम घाग (46), गौसिध्दीन हुसेन कापडी (61), यासिन कासम सनगे (64), सज्जाद हमीद शाह (48) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पाच संशयितांची नावे आहेत.
त्यांच्या विरोधात पोलिस काँस्टेबल गिरीजाप्पा धोंडीराम लोखंडे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार,यातील गौरव व राकेश हे दोघे लोकांकडून रक्कम स्विकारुन बेकायदेशिरपणे मटका जुगार खेळ चालवत होते.
तर अन्य त्याठिकाणी बेकायदेशिरपणे मटका जुगार खेळत असताना ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून रोख रक्कम आणि मोबाईल असा एकूण 45 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569 Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*