दाभोळ सागरी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी पूजा हिरेमठ यांची नियुक्ती झाली असून, त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार आज स्वीकारला आहे. यापूर्वी दापोली येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कर्तव्य बजावणाऱ्या पूजा हिरेमठ आता दाभोळच्या सागरी पोलीस ठाण्याची जबाबदारी सांभाळणार आहेत.

पूजा हिरेमठ यांनी दापोली तसेच दाभोळ परिसरात यापूर्वी काम केले आहे. आपल्या कार्यपद्धतीमुळे त्यांनी जनमानसात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. आता दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात त्यांची नियुक्ती झाल्याने त्यांच्या अनुभवाचा उपयोग परिसरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी होणार आहे.

दाभोळ हा सागरी किनारपट्टीवरील महत्त्वाचा परिसर असल्याने येथील कायदा व सुव्यवस्था, नागरिकांची सुरक्षितता आणि सागरी सुरक्षेच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाची भूमिका महत्त्वाची ठरते. या पार्श्वभूमीवर सहाय्यक पोलीस निरीक्षक पूजा हिरेमठ यांच्यावर दाभोळ सागरी पोलीस ठाण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

दरम्यान, दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले अमोल गोरे यांची मुंबई येथे बदली झाली आहे. त्यांनी दाभोळ येथे पावणे तीन वर्षे सेवा बजावली. या कालावधीत त्यांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कायदा व सुव्यवस्था राखण्यासह विविध प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळल्या. त्यांच्या बदलीनंतर आता पूजा हिरेमठ यांनी पदभार स्वीकारला आहे.
पूजा हिरेमठ यांच्या नियुक्तीमुळे दाभोळ सागरी पोलीस ठाण्याच्या कामकाजाची धुरा त्यांच्या हाती आली आहे.
पूजा हिरेमठ यांना पोलीस सेवेसाठी आणि उज्ज्वल वाटचालीसाठी कोकण कट्टा न्यूज आणि संपादक तेजस बोरघरे यांच्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा! त्यांच्या हातून यापुढेही जनसेवा घडो आणि नव्या जबाबदारीत त्यांना यश मिळो, हीच सदिच्छा!

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













