दापोली : हर्णे बंदरात 47 लाखांचा डिझेल तस्करीचा माल जप्त, दापोली पोलिसांची मोठी कारवाई

banner 468x60

दापोली पोलिसांनी हर्णे बंदरावर कारवाई करत सुमारे ३० हजार लिटर डिझेल सदृश्य पदार्थ जप्त केला आहे. मासेमारी नौकेतून अवैधरित्या विक्रीसाठी आणलेल्या या पदार्थाची किंमत ४७.६२ लाख रुपये आहे.

banner 728x90 banner 728x90

पोलिसांनी सुफी नावाच्या नौकेची तपासणी करत १४ खणांमध्ये हा द्रवपदार्थ व एक सक्शन पंप जप्त केला. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक विवेक आहिरे अधिक तपास करत आहेत.


या यशस्वी कारवाईने परिसरात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *