दापोलीमधून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. दापोली मतदारसंघातून योगेश कदम यांचा विजय झाला आहे. योगेश कदम पहिल्या फेरीपासून योगेश कदमांनी घेतलेली आघाडी सोडली नाहीय त्यामुळे शिवसेनेच्या योगेश कदमांचा विजय झाला आहे.
याबाबतची अधीकृत घोषणा काहीवेळातच होईल. विशेष बाब म्हणजे एकाही फेरीत संजय कदमांनी आघाडी घेतली नाही सर्वच फेऱ्यात योगेश कदमांची आघाडी पाहायला मिळाली आहे. पहिल्या फेरीपासूनच आमदार योगेश कदम यांनी आपले आघाडी कायम राखून 27 व्या फेरीअखेरीस 23903 इतके मताधिक्य घेतले आहे एकूण 28 फेऱ्या आहेत.
दापोलीतील महायुती आघाडीचे उमेदवार योगेशदादा कदम आघाडीवर असल्याने मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू आहे. एकूण 100167 मतदान योगेश कदमांना झाला आहे. संजय कदमांची एकाही फेरीत आघाडी मिळली नाही. मतमोजणीच्या सुरुवातीच्या ५ ते ६ तासांमध्ये शिवसेनेचे योगेश कदमांना प्रचंड मोठे यश मिळालं आहे.
सर्वच फेरीमध्ये त्यांनी आघाडी घेतली आहे. संजय कदमांना एकाही फेरीत आघाडी भेटली नाही . त्यामुळे शिवसेनेच्या योगेश कदमांचा विजय निश्चित झाला आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने राबवलेली लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) गेमचेंजर ठरल्याचे निकालांवरुन दिसत आहे. योगेह्स कदमांचे ग्राऊंड लेव्हलला केलेले काम, स्थानिक पातळीवर साधलेली जातीय समीकरणे ही आता काम करताना पाहायला मिळत आहे.
वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*