ओमानच्या समुद्रकिनाऱ्यालगत एक तेलवाहू जहाज बुडालं होतं. या जहाजावर १३ भारतीय आणि ३ श्रीलंकन नागरिक असे १६ कर्मचारी होते. सोमवारी (१५ जुलै) जहाज बुडाल्याची घटना घडली असून तेव्हापासून हे सर्व कर्मचारी बेपत्ता आहेत.
ओमानच्या सागरी सुरक्षा केंद्राने मंगळवारी (१६ जुलै) याबाबतची बातमी दिली. सुरक्षा केंद्राने सांगितले की, प्रेस्टीज फाल्कन नावाचे तेलवाहू जहाज दुबईच्या बंदरावरून निघाले होते. ओमानमधील येमेन ऐडन बंदराकडे येत असताना हा अपघात घडला.
डुकम या ओमानमधील आणखी एका बंदराजवळ असलेल्या रास मद्राकाच्या शहरापासून आग्नेय दिशेला २५ सागरी मैल अंतरावर हे जहाज बुडाले. दोन दिवसांपासून कर्मचाऱ्यांना शोधण्याची मोहीम सुरू होती.
ओमानमध्ये बुडालेल्या तेलवाहू जहाजावरील 16 पैकी 8 जणांना बचाव पथकाने खोल समुद्रातून बाहेर काढण्यात 2 दिवसांच्या अथक प्रयत्नांनी यश मिळवले. ओमानमधील जहाज दुर्घटनेत संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील युवक समरान इब्राहिम सय्यद यांचा मृत्यू झाल्याची माहिती ओमान कंपनीने गुरुवारी कुटुंबीयांना कळवली आहे.
यामुळे कसबा गावात शोककळा पसरली. ओमान किनार्यावरील शिप प्रेस्टिज फाल्कन दुर्घटनेत समरान इब्राहिम सय्यद (रा. कसबा-पारकर वाडा) याचे गुरुवारी रुग्णालयात निधन झाल्याचे कंपनीकडून कळवण्यात आले.
दोन महिन्यापूर्वीच समरान इब्राहिम सय्यद हा ओमान मध्ये बोटीवर कामासाठी गेला होता. ओमान समुद्रात बुडालेल्या 13 भारतीयांमध्ये त्याचा समावेश होता. या सर्वांना मस्कतमधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान संगमेश्वरमधील कसबा पारकरवाडा येथील सम्रान इब्राहिम सय्यद या तरुणाचा मृत्यू ओढवला.
या दुर्घटनेमुळे कसबा परिसरासह आसपासच्या गावांमध्ये शोककळा पसरली आहे. सोमवारी 15 जुलैला हे तेलवाहू जहाज ओमानमधून जात असताना खोल समुद्रात अचानक अपघात होवून बुडाले. त्यावेळी जहाजावर एकूण 16 जण होते. यामध्ये 13 भारतीय नागरिकांसह श्रीलंकेतील तिघांचा समावेश होता. क्रु मेंबर्स (जहाजावरील कर्मचारी) देखील होते.
13 भारतीयांमध्ये संगमेश्वर तालुक्यातील कसबा पारकरवाडा येथील सम्रान सय्यद या तरुणाचादेखील समावेश होता. जहाज बुडाल्याची खबर कंपनीला मिळताच शोधकार्य सुरु होते. खोल समुद्रात हे जहाज बुडाल्याने कोणी वाचणे अवघडच होते. तरी शोध सुरु होता. दरम्यान ज्या कंपनीचे हे जहाज होते त्या कंपनीने सम्रान सय्यद यांच्या कुटुंबियांशी मेसेजच्या माध्यमातून अपघाताची खबर दिली होती.
बुडालेल्यांमध्ये सम्रानचा समावेश असल्याचे कंपनीने नातेवाईकांना कळवताच कसब्यामध्ये खळबळ उडाली होती. सम्रानचे कुटुंबिय कंपनीशी सातत्याने संपर्क साधून होते. शोध सुरु आहे, अजून सापडलेला नाही असे उत्तर बुधवारपर्यंत कंपनी देत होती.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















