जिल्हा वार्षिक योजना जनसुविधामधून गुहागर तालुक्यातील २२ कामांसाठी १ कोटी ५५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
यासाठी माजी आमदार डॉ. विनय नातू यांच्यासह भाजप जिल्हाध्यक्ष केदार साठे, गुहागर तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे यांच्या मागणीनुसार रत्नागिरी जिल्ह्यचे पालकमंत्री उदय सामंत यांनी निधी मंजूर केला.
जिल्हा वार्षिक योजनेमधून २०२३० २४ या आर्थिक वर्षासाठी ग्रामपंचायतींना निधी मंजूर झाला आहे. त्यामध्ये झोंबडी मुख्य रस्ता ते ग्रामदेवता मंदिराकडे जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण १० लाख, उमरात जांगलेश्वर मंदिर ते स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता १० लाख, शीर कुंभारवाडी केळीचे पाणी ते स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता १० लाख,
पालपेणे शाळा नं. २ ते फरार बाबा मंदिराकडे जाणारा रस्ता १० लाख, साखरी त्रिशुळ सुतारवाडी स्टॉप ते स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता १० लाख, कोतळूक उदमेवाडी सुरेश आरेकर घर ते वसंत सकपाळ घर रस्ता ५ लाख, काँढर काळसूर जोशीवाडी साईमंदिराकडे जाणारा रस्ता ५ लाख, तवसाळ खुर्द स्मशानभूमी ५ लाख, मासू भातगाव मुख्य रस्ता ते आवरे
घाणेकरवाडी रस्ता ५ लाख, आबलोली काजुली मुख्य रस्ता ते खोडदे पुढची निवातेवाडी रस्ता ५ लाख, नरवण मुख्य रस्ता ते पंधरवणे स्मशानभूमी रस्ता ५ लाख, कुडली रेवसाबंदर हातिस्कर घर ते संतोष रामचंद्र पावरी कुडीपर्यंत नवीन रस्ता ५ लाख, काताळे ग्रामपंचायत पूल ते बारस्करवाडी रस्ता ५ लाख,
कुडली माटलवाडी स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता ५ लाख, तवसाळ तांबडवाडी फाटा ते बाबरवाडी दिलीप गावकर घर रस्ता ५ लाख, मळण ग्रामपंचायत इमारत बांधणे २० लाख, तवसाळ तांबड कुरटेवाडी एसटी स्टॉप ते दीपक लक्ष्मण हुमणे घरापर्यंत नवीन रस्ता ५ लाख, वेळंब पांगारी वीरवाडी रस्ता १० लाख, पांगारीतर्फे हवेली भुरकुंडा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे १० लाख या कामांचा यामध्ये समावेश आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















