रत्नागिरी : भाजपला मोठा धक्का बसणार? मोठा गट बाहेर पडण्याच्या तयारीत ?

banner 468x60

माजी खासदार निलेश राणे यांच्यानंतर कोकणात आणखी एक राजकीय घडामोड घडलीय. आगामी निवडणूक पाहता रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झालीय.

भाजपच्या अंतर्गत नाराजीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील काही पदाधिकारी भाजप मधून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे.

banner 728x90 banner 728x90

भाजपला मोठा धक्का बसणार आहे. यामध्ये माजी जिल्हाध्यक्ष, माजी नगराध्यक्ष, तीन माजी नगरसेवक, सरचिटणीस यांच्यासह अनेकांचा समावेश असल्याचे बोललं जात आहे.

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा दक्षिण रत्नागिरीच्या शहर युवाध्यक्ष निवडीवरून वादाची ठिणगी पडल्याचं बोललं जात आहे. काल सायंकाळी याबाबत नाराज गटाकडून अल्टिमेटम दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *