संगमेश्वर एसटी स्थानकाजवळील पुलाखाली बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या एका ४९ वर्षीय व्यक्तीचा उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर मृत्यू झाल्याची घटना १६ नोव्हेंबर रोजी घडली. बाबासो शमशुद्दीन संदे (वय ४९, रा. चांभार चौक, शिरवडे, ता. कराड, जि. सातारा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १६ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास बाबासो संदे हे संगमेश्वर एसटी स्थानकाजवळील पुलाखाली बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर रामपेठ-संगमेश्वर येथील पोलीस पाटील अंगराज प्रकाश कोळवणकर यांनी त्यांना खासगी रुग्णवाहिकेने ग्रामीण रुग्णालय, संगमेश्वर येथे उपचारासाठी दाखल केले.
मात्र, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती पोलीस पाटील अंगराज कोळवणकर यांनी दिल्यानंतर संगमेश्वर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ४५/२०२६, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.२५ वाजता नोंद करण्यात आली आहे.
बाबासो संदे यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी पुढील तपास संगमेश्वर पोलीस करीत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













