चिपळूण तालुक्यातील पेढे-माळेवाडी येथून १८ वर्षे ६ महिन्यांची तरुणी बेपत्ता झाल्याची घटना १३ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली आहे. रिया जगदीश चिवेलकर (वय १८ वर्षे ६ महिने, रा. पेढे, माळेवाडी, ता. चिपळूण) असे बेपत्ता तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी तिच्या वडिलांनी चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम १४०(३) अन्वये अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जगदीश यशवंत चिवेलकर (वय ४७, रा. पेढे, माळेवाडी) यांनी दसऱ्याच्या सणापूर्वी मुलगी रियाला नवीन मोबाईल घेऊन दिला होता. मात्र, रिया या मोबाईलवर वारंवार चॅटिंग करत असल्याचे लक्षात आल्यानंतर वडिलांनी तिला याबाबत समज दिली होती. तसेच तिच्याकडील मोबाईल काढून घेतला होता. या कारणावरून ती नाराज असल्याची माहिती तक्रारीत नमूद करण्यात आली आहे.
दरम्यान, १३ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास रिया घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेली. बराच वेळ होऊनही ती घरी परतली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी तिचा नातेवाईकांकडे तसेच परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, सर्वत्र शोध घेऊनही ती मिळून आली नाही.
यानंतर तिच्या वडिलांनी चिपळूण पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने तिचे अपहरण केले असावे, असा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा रजिस्टर क्रमांक ३५४/२०२६ अन्वये अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेमुळे पेढे-माळेवाडी परिसरात चर्चा सुरू झाली असून, बेपत्ता तरुणीचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. या प्रकरणाचा पुढील तपास चिपळूण पोलीस करीत आहेत.
दरम्यान, तरुणी स्वतःहून घरातून निघून गेली की तिच्या अपहरणामागे अन्य काही कारण आहे, हे पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













