Breaking News
रत्नागिरी : डायलिसिस सेवा बंद करण्याचा प्रयत्न केल्यास कंपनीवर कारवाई करणार उदय सामंतांचा इशारा, रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही डायलिसिस केंद्रे सुरू राहणार चिपळूण : प्रशांत यादव यांच्या ‘स्वामिनी’ निवासस्थानी भाजपचा दिवाळी स्नेहमेळावा, पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठी उपस्थितीखेर्डी येथे दिवाळी फराळाचे आयोजन, स्नेहबंध दृढ करत अनौपचारिक संवादातून साधला संवाद मंडणगड : केळवत घाटात दुचाकी आणि मारुती ब्रेझा कारची धडक, तिघे जखमी खेड : 26 वर्षीय तरुणाचा दुचाकी अपघातात मृत्यू, भेलसई खांबेवाडी येथील वळणावर घडली दुर्घटना, मित्राला पाठीमागे घेऊन जाताना मोटारसायकलचा अपघात रत्नागिरी : आंबा घाटात एसटी बसची उभ्या आयशर टेम्पोला जोराची धडक, 9 प्रवासी जखमी

चिपळूण : प्रशांत यादव यांच्या ‘स्वामिनी’ निवासस्थानी भाजपचा दिवाळी स्नेहमेळावा, पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठी उपस्थितीखेर्डी येथे दिवाळी फराळाचे आयोजन, स्नेहबंध दृढ करत अनौपचारिक संवादातून साधला संवाद

banner 468x60

दीपावलीच्या मंगलमय पर्वाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टीचे रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या वतीने गुरुवारी (ता. १२ नोव्हेंबर) खेर्डी येथील त्यांच्या ‘स्वामिनी’ निवासस्थानी भाजप पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांसाठी दिवाळी फराळ स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला चिपळूण तालुक्यातील भाजप पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.


यावेळी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव आणि भाजपच्या जिल्हा विशेष निमंत्रित सदस्य तसेच वाशिष्ठी डेअरीच्या मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव यांनी उपस्थितांचे आपुलकीने स्वागत केले. दिवाळीच्या निमित्ताने आयोजित या स्नेहमेळाव्यात सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा देत फराळाचा आस्वाद घेतला.
राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील कामाच्या धावपळीतून काही क्षण बाजूला काढत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना एकत्र येण्याची संधी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मिळाली. अनौपचारिक वातावरणात झालेल्या संवादातून जुन्या आठवणींना उजाळा मिळण्याबरोबरच विचारांची देवाणघेवाणही झाली.


कोणत्याही राजकीय पक्षाच्या संघटनेची ताकद ही केवळ पदांमध्ये नसून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमधील एकजूट, परस्पर विश्वास आणि जिव्हाळ्याच्या संबंधांमध्ये असते. हीच संघटनात्मक वीण अधिक घट्ट करण्याच्या उद्देशाने प्रशांत यादव यांनी या स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते.
उत्साही आणि आनंददायी वातावरणात पार पडलेल्या या दिवाळी फराळ कार्यक्रमामुळे भाजपच्या चिपळूण तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये स्नेहबंध अधिक दृढ करण्याची संधी मिळाली.