Breaking News
दापोली : मुख्याधिकारी महेश धुमाळ यांच्याकडून दापोली नगरपंचायत कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण रत्नागिरी : एसटीचे एनसीएमसी स्मार्ट कार्ड आता घरपोच मिळणार, ऑनलाइन स्लॉट बुकिंग सुविधा सुरू, रांगेत उभे राहण्याचा त्रास वाचणार लांजा : भाजीमार्केटमध्ये हायटेक जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, 92 हजारांचा मुद्देमाल जप्त, संगणक, टीव्ही, प्रिंटरसह जुगाराचे साहित्य हस्तगत दापोली : मटका जुगारावर रत्नागिरी LCBची कारवाई, मुद्देमाल जप्त, बुरोंडी नाका परिसरात छापा दापोली : टाळसुरेत भरदिवसा घरफोडी, 3 लाख 97 हजारांचे सोन्याचे दागिने लंपासघरातील लोखंडी कपाटाचे लॉकर चावीनेच उघडले

दापोली : मुख्याधिकारी महेश धुमाळ यांच्याकडून दापोली नगरपंचायत कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

banner 468x60

दीपावली सणाचे औचित्य साधून दापोली नगरपंचायतीचे मुख्याधिकारी महेश धुमाळ यांनी नगरपंचायतीच्या अधिकारी व कर्मचारी वर्गासाठी विशेष दिवाळी सदिच्छा उपक्रम राबविला. नगरपंचायतीच्या विविध विभागांत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांनी दिवाळीनिमित्त भेट देत सणाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
दापोली नगरपंचायतीच्या दैनंदिन कामकाजात सफाई कामगारांपासून ते कार्यालयीन कर्मचारी आणि विविध विभागांतील कर्मचाऱ्यांपर्यंत प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे आहे.

शहराची स्वच्छता, नागरी सुविधा आणि प्रशासकीय कामकाज सुरळीत ठेवण्यासाठी हे कर्मचारी सातत्याने मेहनत घेत असतात. त्यांच्या याच कामाची आणि योगदानाची दखल घेत मुख्याधिकारी महेश धुमाळ यांनी कर्मचाऱ्यांशी वैयक्तिक संवाद साधत त्यांना दिवाळीची भेट दिली.
कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचा सन्मान करणे आणि त्यांच्या कामाप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे मुख्याधिकारी धुमाळ यांनी यावेळी नमूद केले.


मुख्याधिकाऱ्यांनी दिवाळीनिमित्त दाखविलेल्या या आपुलकीमुळे नगरपंचायतीच्या कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. केवळ प्रशासकीय कामकाजापुरते मर्यादित न राहता कर्मचाऱ्यांशी जिव्हाळ्याचे नाते जपणाऱ्या या उपक्रमाचे कर्मचारी वर्गातून स्वागत करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *