खेड : भरणे नाका येथे कल्याण मटका जुगारावर पोलिसांची कारवाई

banner 468x60

खेड तालुक्यातील भरणे नाका परिसरात कल्याण मटका जुगार सुरू असल्याचे आढळून आल्यानंतर खेड पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणी सुहास संजय देशमुख (वय ३५, रा. भरणे, गोवळवाडी, ता. खेड) याच्याविरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार, दि. २ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १०.१५ वाजण्याच्या सुमारास भरणे नाका येथे ही कारवाई करण्यात आली. यावेळी आरोपी सुहास देशमुख हा कल्याण मटका जुगारातील शुभ अंकावर पैसे लावून जुगार खेळवत असल्याचे पोलिसांना आढळून आले.

या कारवाईत पोलिसांनी १ हजार २४० रुपये रोख रक्कम आणि जुगार खेळण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण १ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३४९/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी महिला पोलीस शिपाई प्रतीक्षा लालबा वाघमारे यांनी फिर्याद दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *