एल निनोच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात उद्भवणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेने ‘मिशन बंधारे’ ही व्यापक लोकचळवळ हाती घेतली आहे. या अभियानांतर्गत गावागावात बंधारे बांधण्याची मोहीम तीव्रतेने राबवली जात असून, याच उपक्रमाचा एक भाग म्हणून आज शृंगारतळी येथील शृंगारी मोहल्ला येथे श्रमदानातून बंधारा बांधण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान. हारून घारे यांनी भूषवले, तर बंधारा उभारणीचे सर्व नियोजन ग्रामपंचायत पाटपन्हाळे, जमातुल मुस्लिमीन शृंगारी व उपसरपंच आसिम साल्हे यांनी केले होते.
या प्रसंगी गुहागर पंचायत समिती सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती निलेश सुर्वे, पंचायत समिती सदस्य गौरव वेल्हाळ, उपसरपंच आसिम साल्हे, ग्रामपंचायत सदस्य रियाज ठाकूर, चंद्रकांत तेलगडे, शृंगारी जमातीचे सिद्दीक घारे, यासिन घारे तसेच ग्रामविस्तार अधिकारी. बडद यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय परिसरातील ग्रामस्थ, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका यांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवला. गावातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













