Breaking News
रत्नागिरी : मित्रांसोबत क्रिकेट खेळत होता, अचानक चक्कर येऊन कोसळला 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू खेड : शिवाजीनगरमध्ये रस्त्यावरील खड्ड्याची तात्पुरती मलमपट्टी, कायमस्वरूपी दुरुस्ती कधी? चिपळूण : 49 वर्षीय व्यक्तीची आत्महत्या, सावर्डे पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद खेड : मंत्री योगेश कदम यांचा पीए असल्याचे भासवून 5 हजारांची फसवणूक, खेडमध्ये गुन्हा दाखल, मंत्र्यांची भेट घडवून देण्याचे आणि काम करून देण्याचे दिले होते आश्वासन, रविराज चिखले याच्याविरोधात कारवाईची नोंद दापोली : तीन प्रकल्पांविरोधात संघर्ष पेटणार! प्रकल्प रद्द करण्यासाठी युवा रोजगार जनहक्क संघर्ष संघ आक्रमक

खेड : शिवाजीनगरमध्ये रस्त्यावरील खड्ड्याची तात्पुरती मलमपट्टी, कायमस्वरूपी दुरुस्ती कधी?

banner 468x60

खेड शहरातील शिवाजीनगर परिसरात गार्डनजवळ रस्त्यावर पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या समस्येकडे लक्ष वेधल्यानंतर खड्ड्यावर तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली असली, तरी कायमस्वरूपी दुरुस्ती कधी होणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

शिवाजीनगर परिसरातील गार्डनजवळील रस्त्यावर मोठा खड्डा पडल्याने वाहनचालकांसह स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. वाहनांची वर्दळ असलेल्या या मार्गावर खड्ड्यामुळे अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यामुळे संबंधित प्रशासनाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात येत होती.

दरम्यान, या खड्ड्यावर तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली आहे. मात्र, केवळ तात्पुरती डागडुजी करून प्रश्न सुटणार का? पावसामुळे किंवा वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे पुन्हा खड्डा निर्माण झाल्यास जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अपघात झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? असा सवाल नागरिकांकडून केला जात असून, संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी रस्त्याची कायमस्वरूपी आणि दर्जेदार दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

आता संबंधित प्रशासन तात्पुरत्या मलमपट्टीपलीकडे जाऊन कायमस्वरूपी उपाययोजना करणार का, याकडे शिवाजीनगरमधील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *