Breaking News
चिपळुण : 99 रुपयांत अस्थिविकार आणि हाडांच्या ठिसूळपणाची तपासणी, अपरांत हॉस्पिटलतर्फे आज विशेष शिबिर! चिपळूण : सावर्डेत कंटेनरचे सील तोडून औषधांचे बॉक्स लंपास, 1.64 लाखांचा माल चोरीला रत्नागिरी : पोलिसांच्या 18 QRT जवानांना बोट सेलिंगचे प्रशिक्षण, सागरी सुरक्षेसाठी कौशल्यवृद्धी, भाट्ये समुद्रकिनारी सात दिवसांचे प्रशिक्षण शिबिर गुहागरच्या तळवलीत बिबट्याची दहशत, शिगवणवाडीत पाळीव कुत्र्यांना बनवले भक्ष्य, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण राजापूर : नाणार इंगळवाडी दुर्घटनेतील चार विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दीड लाखांचे सानुग्रह अनुदान मंजूर, जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीचा निर्णय

गुहागरच्या तळवलीत बिबट्याची दहशत, शिगवणवाडीत पाळीव कुत्र्यांना बनवले भक्ष्य, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

banner 468x60

गुहागर तालुक्यातील तळवली परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तळवली येथील शिगवणवाडी परिसरात बिबट्याने पाळीव कुत्र्यांना भक्ष्य बनवल्याच्या घटना समोर आल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. विशेषतः शेतकरी, गुराखी तसेच पहाटे आणि संध्याकाळच्या वेळी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

परिसरात बिबट्याचा वावर असल्याची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन परिसराची पाहणी केली. बिबट्याच्या संभाव्य हालचालींचा माग घेण्याचाही प्रयत्न करण्यात आला. मात्र, पाहणीदरम्यान वन कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष बिबट्याचे दर्शन झाले नसल्याची माहिती मिळाली.

दरम्यान, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून बिबट्याच्या वावराच्या पार्श्वभूमीवर घ्यावयाच्या खबरदारीबाबत मार्गदर्शन केले. रात्रीच्या वेळी तसेच पहाटे घराबाहेर पडताना नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी, सोबत बॅटरी आणि काठी ठेवावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शेतात काम करणारे शेतकरी, जनावरे चारण्यासाठी जाणारे गुराखी आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेबाबत पालकांमध्येही चिंता व्यक्त होत आहे.

बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी तळवली परिसरातील ग्रामस्थांकडून केली जात आहे. वनविभागाने या परिसरातील हालचालींवर लक्ष ठेवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.

नागरिकांनी घ्यावयाची काळजी : बिबट्या दिसल्यास त्याच्या जवळ जाण्याचा किंवा त्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न करू नये. लहान मुलांना एकटे बाहेर पाठवू नये आणि पाळीव प्राण्यांना रात्री सुरक्षित ठिकाणी ठेवावे. बिबट्याचा वावर आढळल्यास वनविभागाला तातडीने माहिती द्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *