Breaking News
चिपळूण : सावर्डेत कंटेनरचे सील तोडून औषधांचे बॉक्स लंपास, 1.64 लाखांचा माल चोरीला रत्नागिरी : पोलिसांच्या 18 QRT जवानांना बोट सेलिंगचे प्रशिक्षण, सागरी सुरक्षेसाठी कौशल्यवृद्धी, भाट्ये समुद्रकिनारी सात दिवसांचे प्रशिक्षण शिबिर गुहागरच्या तळवलीत बिबट्याची दहशत, शिगवणवाडीत पाळीव कुत्र्यांना बनवले भक्ष्य, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण राजापूर : नाणार इंगळवाडी दुर्घटनेतील चार विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दीड लाखांचे सानुग्रह अनुदान मंजूर, जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीचा निर्णय रत्नागिरी : घरगुती वादातून महिलेने घेतले उंदीर मारण्याचे औषध, उपचारादरम्यान मुंबईत मृत्यू

रत्नागिरी : पोलिसांच्या 18 QRT जवानांना बोट सेलिंगचे प्रशिक्षण, सागरी सुरक्षेसाठी कौशल्यवृद्धी, भाट्ये समुद्रकिनारी सात दिवसांचे प्रशिक्षण शिबिर

banner 468x60

रत्नागिरी : सागरी सुरक्षेच्या दृष्टीने रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील क्विक रिस्पॉन्स टीम (QRT) च्या १८ जवानांना बोट सेलिंगचे प्रशिक्षण देण्यात आले. सागरी किनारपट्टीवरील आपत्कालीन परिस्थितींना प्रभावीपणे सामोरे जाणे, तसेच जवानांची कार्यक्षमता आणि सागरी मोहिमांसाठी आवश्यक कौशल्ये वाढविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

२ महाराष्ट्र नेव्हल युनिट (एनसीसी), रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘The Most Enterprising Naval Unit (MENU-27) Camp’ अंतर्गत हे प्रशिक्षण देण्यात आले. दिनांक ७ ते १३ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत भाट्ये समुद्रकिनारी आयोजित या शिबिरात रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील १८ जवानांनी सहभाग घेतला. या प्रशिक्षणादरम्यान जवानांना बोट सेलिंगचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले.

रत्नागिरी जिल्ह्याला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला असून, सागरी सुरक्षा, आपत्कालीन परिस्थिती आणि विशेष मोहिमांच्या अनुषंगाने पोलीस जवानांना विविध कौशल्यांचे प्रशिक्षण मिळणे महत्त्वाचे आहे. समुद्रातील प्रतिकूल परिस्थितीचा सामना करणे, सागरी क्षेत्रातील हालचालींसाठी आवश्यक कौशल्ये विकसित करणे आणि गरज भासल्यास बचावकार्य व आपत्कालीन प्रतिसाद अधिक प्रभावीपणे पार पाडणे, या दृष्टीने अशा प्रशिक्षण उपक्रमांना विशेष महत्त्व आहे.

रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रशिक्षणात जवानांनी सहभाग घेतला. या शिबिरासाठी २ महाराष्ट्र नेव्हल युनिट (एनसीसी), रत्नागिरीचे डेप्युटी कॅम्प कमांडंट विशाल भोसले, तसेच रत्नागिरी पोलीस दलाच्या सुरक्षा शाखेचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप यादव यांच्यासह पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.

या प्रशिक्षणामुळे रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील QRT जवानांना सागरी परिस्थितीत काम करण्यासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळाली असून, किनारपट्टी भागातील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *