संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत, सन २०२६-२७ च्या ‘मिशन बंधारे अभियानांतर्गत’ मुंढे ग्रामपंचायतीच्या वतीने वरचीवाडी येथे श्रमदानातून दोन बंधारे बांधण्यात आले. जिल्हा परिषद रत्नागिरी, पंचायत समिती चिपळूण आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमात ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
पावसाच्या पाण्याचा साठा वाढवणे, भूजलपातळी सुधारण्यास हातभार लावणे आणि आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता कमी करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीची जोड देत ग्रामस्थांनी श्रमदानातून जलसंधारणाचे महत्त्व अधोरेखित केले.
या उपक्रमासाठी चिपळूण पंचायत समितीचे सभापती सूर्यकांत घेतले यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या नेहा रहाटे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे चिपळूण तालुकाप्रमुख बळीराम गुजर उपस्थित होते.
तसेच माजी सरपंच मयूर खेतले, माजी उपसरपंच श्याम खेतले, ग्रामसेवक अस्वले, माजी ग्रामपंचायत सदस्य विजय मोहिते, रुपेश खेतले, प्रमोद महाडिक, सूरज खेतले, सुदेश रहाटे, ग्रामपंचायत कर्मचारी संकेत खेतले, दिलीप खेतले, बाळू गायकवाड आणि संजय मोरे यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला.
संभाव्य दुष्काळाचे आव्हान लक्षात घेता, जलसंधारणाची कामे लोकसहभागातून पूर्ण करणे ही काळाची गरज बनली आहे. प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ यांच्या एकत्रित प्रयत्नांतून पाणी साठवण आणि भूजल पुनर्भरणाला चालना मिळू शकते. मुंढे येथील वरचीवाडीत श्रमदानातून उभारण्यात आलेले हे दोन बंधारे ग्रामीण भागातील जलसंधारणाच्या सामूहिक प्रयत्नांचे उदाहरण ठरले आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













