रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे परिसरात कंटेनरच्या मागील दरवाजाचे सील व लॉक तोडून औषधांचे बॉक्स चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. या चोरीत एकूण १ लाख ६४ हजार २०६ रुपये ७४ पैसे किमतीचा औषधसाठा लंपास करण्यात आला आहे. याप्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनीस कदूस अहमद (वय २६, रा. कपरवार, ता. बरहज, जि. देवरिया, उत्तर प्रदेश) हे गुजरात राज्यातील नोंदणी क्रमांक असलेल्या कंटेनरमधून मालाची वाहतूक करत होते. १३ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २.३० ते सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान ते सावर्डे येथील हॉटेल स्वामी व हॉटेल पंचामृत परिसरात जेवण करून आराम करत होते.
याच कालावधीत अज्ञात व्यक्तीने कंटेनरच्या मागील दरवाजाचे सील व लॉक तोडून दरवाजा उघडला. त्यानंतर कंटेनरमधील औषधांचे बॉक्स फिर्यादी यांच्या संमतीशिवाय चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
चोरीला गेलेल्या मालामध्ये १ लाख ६ हजार ९९७ रुपये ६० पैसे किमतीचे ‘Digene Tab Mint 15s’ औषधाचे सहा बॉक्स, तसेच ५७ हजार २०९ रुपये १४ पैसे किमतीचे ‘Brufen 400 mg 20’ औषधाचे सहा बॉक्स यांचा समावेश आहे. या दोन्ही प्रकारच्या औषधांची एकूण किंमत १ लाख ६४ हजार २०६ रुपये ७४ पैसे आहे.
या प्रकरणी १६ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ७.०१ वाजता सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १३२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम ३०५(अ) नुसार अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सावर्डे पोलीस करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













