चिपळूणात : 2 ठिकाणी मटका जुगारावर पोलिसांची कारवाई, मुद्देमाल जप्त

banner 468x60

चिपळूण तालुक्यातील अलोरे आणि बहादरशेख नाका परिसरात पोलिसांनी कारवाई करत मटका जुगारप्रकरणी दोघांवर कारवाई केली. या दोन्ही कारवायांमध्ये रोख रकमेसह जुगाराचे साहित्य असा एकूण ३ हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पहिली कारवाई २३ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास अलोरे बाजारपेठेतील भाजीमार्केटच्या मागील बाजूस, जंगली झाडाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस कर्मचारी वैभव गजानन मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चंद्रकांत सखाराम देवरुखकर (वय ६७, रा. अलोरे सोनरवाडी, ता. चिपळूण) हा मुंबई मटका जुगार चालविताना आढळून आला. त्याच्याकडून ९३० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ९३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी अलोरे शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ११३/२०२६, महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

दुसरी कारवाई २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३१ वाजता बहादरशेख नाका परिसरातील वांगडे मोहल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यालगत गनी प्लाझा इमारतीच्या मागील बाजूस करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस कर्मचारी योगेश प्रकाश नार्वेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मोहन पांडुरंग कदम (वय ५३, रा. दयानंद अपार्टमेंट, गुरुकुल कॉलेजच्या मागे, बहादरशेख नाका, चिपळूण) हा कल्याण मटका जुगार खेळताना आढळून आला. त्याच्याकडून ३ हजार रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ३ हजार ५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दोन्ही प्रकरणांत महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२(अ) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *