खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात बुधवारी (२ सप्टेंबर) सायंकाळी खेड-चिपळूण बसला अपघात झाला. बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात कंटेनरची धडक बसल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे.
बस खेडहून चिपळूणच्या दिशेने जात असताना भोस्ते घाटात कंटेनर चालकाने बसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन्ही वाहनांचा अपघात झाला. अपघातानंतर कंटेनर चालक घटनास्थळावरून फरार झाल्याचे सांगण्यात आले.
सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. बसमधील सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













