गुहागर तालुक्यातील अडुर-पिंपळवाडी येथे ५७ वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (१ सप्टेंबर) सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद मनोहर नार्वेकर (वय ५७, रा. अडुर-पिंपळवाडी, ता. गुहागर, जि. रत्नागिरी) यांनी अडुर येथील स्मशानभूमीच्या शेडला असलेल्या लोखंडी अँगलला नायलॉनच्या दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.
घटनेची माहिती मिळताच संबंधितांनी गुहागर पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. याप्रकरणी रत्नाकर भालचंद्र नार्वेकर यांनी खबर दिली आहे.
गुहागर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ३५/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. या घटनेची नोंद १ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजून ४२ मिनिटांनी करण्यात आली असून, पुढील तपास गुहागर पोलीस करीत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













