कोकण : ‘मोदी एक्स्प्रेस’च्या तारखेत बदल 11 आणि 13 सप्टेंबरला दादरहून कोकणासाठी धावणार ‘मोदी एक्स्प्रेस’; मंत्री नितेश राणेंची माहिती

banner 468x60

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या आग्रहाला सकारात्मक प्रतिसाद देत ‘मोदी एक्स्प्रेस’च्या प्रवासाच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. आता ११ आणि १३ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता दादर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १४ वरून ‘मोदी एक्स्प्रेस’ कोकणाच्या दिशेने रवाना होणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी दरवर्षी ‘मोदी एक्स्प्रेस’ची व्यवस्था करण्यात येते. यंदा यापूर्वी ९ आणि ११ सप्टेंबर रोजी या विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, या तारखांमध्ये बदल करण्याची मागणी चाकरमान्यांकडून करण्यात आली होती.

चाकरमान्यांच्या मागणीचा विचार करून आता ‘मोदी एक्स्प्रेस’ ११ आणि १३ सप्टेंबर रोजी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही गाड्या सकाळी १०.३० वाजता दादर स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १४ वरून कोकणाच्या दिशेने रवाना होतील.

गणेशोत्सवाच्या काळात चाकरमान्यांना आनंददायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात कोकणात पोहोचता यावे, या उद्देशाने या विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवासासाठी इच्छुक चाकरमान्यांनी भारतीय जनता पक्षाच्या मंडळ अध्यक्षांशी संपर्क साधून तिकिटांचे बुकिंग लवकरात लवकर करून घ्यावे, असे आवाहन मंत्री नितेश राणे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *