गुहागर : कुटगिरी येथे लोखंडी साकव कोसळून बैलाचा मृत्यू, नुकसानग्रस्त शेतकऱ्याला शासकीय मदत सुपूर्द

banner 468x60

मौजे कुटगिरी येथील भैरी शंकर मंदिराजवळील तिजग नदीवरील लोखंडी साकव काल सायंकाळी अचानक कोसळला. या दुर्घटनेत आठ जनावरे अडकली होती. स्थानिक ग्रामस्थांच्या तत्पर मदतीने सर्व आठही जनावरांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले.

banner 728x90


या घटनेत दिलीप नारायण लिंगायत यांच्या मालकीचा एक बैल मृत झाला, तर उर्वरित जनावरे किरकोळ जखमी झाली. पशुवैद्यकीय विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी जनावरांवर उपचार केले तसेच मृत बैलाचे शवविच्छेदन पूर्ण केले.


मृत बैलाच्या नुकसानीपोटी शेतकरी लिंगायत यांना शासनाकडून 32 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. सदर मदतीचा धनादेश आज सकाळी 11.30 वाजता उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार गुहागर परीक्षित पाटील, मंडळ अधिकारी पाटपन्हाळे अनिल राठोड तसेच ग्राम महसूल अधिकारी यांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आला.

यावेळी प्रांताधिकारी यांनी जखमी जनावरांवर आवश्यक उपचार सुरू ठेवण्याच्या सूचना पशुवैद्यकीय विभागाला दिल्या.

घटनेनंतर अवघ्या 18 तासांच्या आत नुकसानग्रस्त शेतकऱ्याला शासकीय मदत उपलब्ध करून देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *