Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

संगमेश्वरात रफीक मार्टवर चोरट्याचा डल्ला, 60 हजारांचा किराणामाल लंपास

banner 468x60

संगमेश्वर शहरातील रफीक मार्ट किराणा दुकानात अज्ञात चोरट्याने डल्ला मारत सुमारे ₹६०,३४० किमतीचा किराणामाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही चोरी २५ जुलै २०२६ रोजी रात्री १०.०० ते २६ जुलै २०२६ रोजी सकाळी ८.३० या कालावधीत घडली. फिर्यादी मुमताज रफिक मेमन (वय ४६, रा. कसबा उभा मोहल्ला, ता. संगमेश्वर) यांच्या मालकीच्या रफीक मार्ट किराणा दुकानात अज्ञात चोरट्याने प्रवेश करून त्यांच्या संमतीशिवाय दुकानातील विविध किराणा वस्तू चोरून नेल्या.

चोरीस गेलेल्या मालामध्ये ५० किलो वजनाची साखरेची दोन पोती (₹४,०००), ३५ किलो वजनाची मिरचीची दोन पोती (₹१६,०००), ३० किलो वजनाची जिऱ्याची एक बॅग (₹६,०००), जेमिनी सनफ्लॉवर तेलाचे पाच बॉक्स (₹१०,२००), राजा सोया तेलाच्या चार बरण्या (₹८,८००), जेमिनी सनफ्लॉवर तेलाच्या तीन बरण्या (₹७,७४०) तसेच ₹७,६०० किमतीचा इतर किराणामाल असा एकूण ₹६०,३४० किमतीचा माल चोरीस गेला आहे.

या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, वाढत्या चोरीच्या घटनांमुळे बाजारपेठेतील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे चोरट्याचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *