Breaking News
दाभोळ : महाडिक स्टॉप ते कोळथरे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात, “कोकण कट्टा न्यूजच्या” वृत्ताची दखल चिपळूण : गडनदी-जामदा प्रकल्पातील देयक प्रकरणी कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव निलंबित मंडणगड : रिक्षा-रुग्णवाहिका मिळेना मध्यरात्री महिलेची प्रकृती गंभीर, ‘112’ नंबरच्या कॉलवर मंडणगड पोलिसांची धावपोलिसांची तत्परता महिलेला ठरली जीवनदायी संगमेश्वर : तीन आमरण उपोषणे, 69 वर्षीय वृद्धाची आत्मदहनाच्या इशाऱ्याची पुनरावृत्ती; तरीही कुळाच्या जमिनीचा न्याय कागदावरच, देवरुख तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी रखडली, निर्णय न झाल्यास उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दापोली : मद्यधुंद अवस्थेत ईको कार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा

दापोली : विहिरीत पडलेल्या भेकराची वन विभागाकडून यशस्वी सुटका

banner 468x60

दापोली तालुक्यातील खेर्डी-माळवाडी येथे विहिरीत पडलेल्या एका भेकराची वन विभागाच्या रेस्क्यू पथकाने ग्रामस्थांच्या मदतीने यशस्वी सुटका केली. मात्र, या दुर्घटनेत भेकराच्या पुढील उजव्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी पुणे येथील वन्यजीव रेस्क्यू सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.

banner 728x90

खेर्डी-माळवाडी येथील ग्रामस्थ पांडुरंग केळकर यांनी त्यांच्या शेतातील विहिरीत भेकर पडल्याचे निदर्शनास येताच तातडीने दापोली वन विभागाला माहिती दिली. माहिती मिळताच वन विभागाचे रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने काळजीपूर्वक बचावकार्य राबवून भेकराला सुरक्षितपणे विहिरीतून बाहेर काढण्यात आले.

सुटकेनंतर वन अधिकाऱ्यांनी भेकराची तपासणी केली असता त्याच्या पुढील उजव्या पायाला गंभीर दुखापत झाल्याचे आढळले. त्यानंतर त्याला अधिक उपचारासाठी पुणे येथील वन्यजीव रेस्क्यू सेंटरमध्ये पाठविण्यात आले असून त्याच्यावर आवश्यक वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

या घटनेनिमित्त वन विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, जखमी, अनाथ किंवा संकटात सापडलेले कोणतेही वन्यजीव आढळल्यास स्वतःहून त्यांना हाताळण्याचा प्रयत्न करू नये. अशा वेळी तात्काळ ‘हॅलो फॉरेस्ट १९२६’ या हेल्पलाईनवर किंवा वनक्षेत्रपाल, दापोली कार्यालयाशी संपर्क साधावा, जेणेकरून प्रशिक्षित रेस्क्यू पथकाच्या माध्यमातून वन्यजीवांची सुरक्षित सुटका आणि उपचार करता येतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *