संगमेश्वर तालुक्यातील पोचरी खालची देसाईवाडी येथे किरकोळ वादातून एका तरुणाला चिव्याच्या काठीने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी संगमेश्वर पोलिसांनी दोन नातेवाईकांसह अन्य दोन अनोळखी इसमांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रथमेश संतोष राऊत (३२) आणि आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. २० मार्च रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास आरोपींची आई सविता जाधव यांनी प्रथमेश यांना हाक मारली. त्यावर प्रथमेश यांनी “तुम्ही मला हाक मारू नका आणि आमच्याशी बोलू नका” असे सांगितले. या गोष्टीचा राग मनात धरून आरोपी विशाल संजय जाधव याने प्रथमेश यांना गाठले आणि “तू माझ्या आईला काय बोललास?” असा जाब विचारत शिवीगाळ व मारहाण सुरू केली.
मारहाण सुरू असताना आरोपी विशाल, ओंकार जाधव आणि त्यांच्यासोबत असलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी प्रथमेश यांना पकडून ठेवले. यावेळी एका आरोपीने जवळच पडलेली चिव्याची काठी उचलून प्रथमेश यांच्या डोक्यात, डाव्या डोळ्यावर आणि पाठीवर जोरात मारून त्यांना जखमी केले.
पतीला वाचवण्यासाठी त्यांची पत्नी प्रांजल राऊत मध्ये आली असता, आरोपी ओंकार जाधव याने “तू मध्ये आलीस तर तुला पण मारून टाकीन” अशी जीवे मारण्याची धमकी दिली.
या घटनेनंतर जखमी प्रथमेश राऊत यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी रात्री ९ वाजता आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११८(१), कलम ११५(२), कलम ३५२, कलम ३५१(२), कलम ३(५) कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे:

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













