दापोली तालुक्यातील टेटवली (श्रीराम नगर) येथे दुर्गामाता सेवा प्रतिष्ठानच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या शनिवार, २१ मार्च २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १.०० या वेळेत हे शिबिर पार पडणार असून, परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
हे शिबिर दुर्गामाता सेवा प्रतिष्ठान, टेटवली येथेच आयोजित करण्यात आले असून, महाड येथील जनकल्याण रक्तपेढीच्या सहकार्याने रक्त संकलन करण्यात येणार आहे. समाजातील रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, या उदात्त हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
“रक्तदान ही जनसामान्यांची सेवा, यालाच मानूया ईश्वरसेवा” या संदेशातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सध्या विविध रुग्णालयांमध्ये रक्ताची गरज भासत असताना, अशा शिबिरांमुळे अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळू शकते.
या उपक्रमासाठी किशोर पालकर, मुरलीधर यदमळ, भाऊ भागवत आणि अमर पड्याळ हे समन्वयक म्हणून कार्यरत असून, नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता स्वेच्छेने रक्तदान करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
या रक्तदान शिबिरात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी किशोर पालकर – ७४९९३२६२१२
मुरलीधर यदमळ – ८८३०९२२५७९
भाऊ भागवत – ९१५८३७३३५९
अमर पड्याळ – ८३०८३६९५२४ या संपर्क क्रमांकांवर संपर्क साधावा. समाजहिताच्या या उपक्रमाला प्रतिसाद देत अधिकाधिक नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असेही आयोजकांनी नमूद केले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*














