गुहागरहून निघालेले ऑलिव्ह रिडले कासव हे चक्क श्रीलंकेच्या समुद्रापर्य़ंत पोहोचले आहेत. शेकडो मैलांचा हा प्रवास बागेश्री नावाच्या कासवाने अवघ्या साडेचार महिन्यात पार केला आहे.
🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या
आपल्या मोबाईलवर*
https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi
👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909
सध्या श्रीलंकेच्या समुद्री हद्दीत असलेली बागेश्री तिच्या गॅले या शहराकडे वळत आहे. वाईल्ड लाईफ ऑफ इंडियाने फेब्रुवारी महिन्यात गुहागरच्या समुद्रा किनाऱ्यावर आलेल्या दोन ऑलिव्ह रिडले कासवांना बागेश्री व गुहा अशी नावं दिली होती.
या दोन्ही कासवांना 21 फेब्रुवारी रोजी रेडीओ टॅग करून सॅटेलाईट ट्रान्समीटरशी जोडण्यात आले होते. त्यानंतर 23 फ्रेबुवारी रोजी या कासवांना समुद्रात सोडण्यात आले होते. त्यामुळे या दोन्ही कासवांचे लोकेशन वाईल्ड लाईफ ऑफ इंडियाला सतत मिळत असते.
18 जून रोजी बागेश्री हे कासव कन्याकुमारी येथे दिसले होते. त्यानंतर या कासवाने श्रीलंकेकडे प्रवास सुरू केला. दरम्यान 3 जुलै रोजी या कासवाने श्रीलंकेची सागरी हद्द पार केली आहे. तिथून ते गॅले या शहराच्या दिशेने जात असल्याचे दिसत आहे.
दरम्यान गुहा हे कासव दक्षिणेकडे न जाता उत्तरेच्या दिशेने गेले आहे. गुहागरवरून ते लक्ष्यद्विपजवळील कादमत बेटाजवळ गेले. तिथून या कासवाने उत्तरेकडचा मार्ग धरला आहे. पश्चिमेकडील समुद्र तटावर येणाऱ्या ऑलिव्ह रिडले कासवांचा प्रवास जाणून घेण्यासाठी मॅग्रोव्ह फाऊंडेशन व महाराष्ट्र वन्य विभागाने कासवांना सॅटेलाईट ट्रान्जिस्टर जोडण्याचे ठरवले होते.
यामुळे पश्चिमेकडील समुद्रात असलेल्या रिडले कासवांच्या प्रवासावर संशोधन करण्यास मदत मिळणार आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















