Kokan  

महाराष्ट्राचे’दादा’ गेले अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू; महाराष्ट्र हादरला

banner 468x60

महाराष्ट्राला हादरवणारी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री आणि धडाडीचे नेते म्हणून ओळख असणारे अजित पवार (Ajit Pawar Dead) यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. आज सकाळी बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला. नेमकं काय घडलं?

banner 728x90

(Ajit Pawar Dead)
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज बारामतीमध्ये अजित पवार यांच्या चार सभा होत्या. या सभांसाठी ते सकाळीच नेहमीप्रमाणे लवकर बाहेर पडले होते. यादरम्यान लँडिंगदरम्यान बारामतीमध्ये विमानाचा अपघात झाला. यावेळी अजित पवारांसह अन्य सहाजण देखील विमानात होते. परंतु विमानाचा अपघात इतका भीषण होता की, अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. (

Ajit Pawar Dead Baramati Plane Crash)
1 विमानात कोण कोण होते? (Ajit Pawar Dead Baramati Plane Crash)
2 अजित पवार
3 विदीप जाधव
4 पिंकी माळी
5 कॅप्टन सुमित कपूर
6 कॅप्टन शांभवी पाठक
अजित पवारांच्या अकाली जाण्याने राज्याला मुळापासून हादरा- (Ajit Pawar Dead Maharashtra)
अत्यंत गंभीर अवस्थेमध्ये अजित पवारांसह जखमींना बारामतीमध्येच उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यामुळे अजित पवार यांच्या दादा पर्वाच्या राजकारणाचा अकाली अस्त झाला आहे.

राज्याच्या राजकारणामध्ये गेल्या साडेचार दशकांपासून अजित पवार हे गारुड सातत्याने महाराष्ट्र ाच्या राजकारणामध्ये चर्चिलं गेलं आहे. राज्याच्या राजकारणामध्ये त्यांची धडाडी, राष्ट्रवादीचे एकहाती नेतृत्व आणि शरद पवारांचे वारसदार म्हणून अजित पवार यांच्याकडे सातत्याने पाहिलं जात होतं. मात्र, अजित पवार यांच्या अकाली जाण्याने पवार कुटुंबीयांसह अवघ्या राज्याला मुळापासून हादरा बसला आहे. अपघातग्रस्त विमान पाहिल्यानंतर अनेकांना जागेवर अश्रु अनावर झाले.  DGCA ने दिलेल्या माहितीनुसार, या विमानात एकूण पाच जण प्रवास करत होते. त्यामध्ये अजित पवार, त्यांचे स्वीय सहाय्यक, एक बॉडिगार्ड आणि दोन पायलट्सचा समावेश होता.
बारामतीत आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार यांच्या चार जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी ते मुंबईतून बारामतीत विमानाने जात होते.
यावेळी बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर लँडिंग करताना हा अपघात झाला. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक प्रचार सभेसाठी अजित पवार आज बारामती तालुक्यात सकाळी निरावागज येथे जाणार होते. त्यानंतर पणदरे, करंजेपूल, सुपा येथे त्यांच्या प्रचारासाठी भेटी आणि कार्यक्रम होणार होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *