Breaking News
दापोली : मद्यधुंद कारचालकाची पादचाऱ्यांना धडक, दोघे गंभीर जखमी, कुंभवे शिगवणवाडी येथील घटना देवरुख : आंबव येथे रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थेत आढळला तरुण, उपचारादरम्यान मृत्यू, फिटचा झटका आल्याने डोक्याला दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती रत्नागिरीच्या कोकणनगरमध्ये घरफोडी, 4 लाख 72 हजारांचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास संगमेश्वर : कडवई प्राथमिक आरोग्य केंद्र समस्यांच्या विळख्यात, धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळण्याच्या स्थितीत संगमेश्वर : नाणीज येथे प्रवासादरम्यान प्रकृती बिघडली, 28 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, मावस बहिणीच्या साखरपुड्यासाठी गेला होता कुटुंबासोबत

खेड : धामणंद येथे डोहात बुडून वृद्धाचा मृत्यू

banner 468x60

खेड तालुक्यातील धामणंद येथे घरामागील डोहात बुडून एका ६९ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. महेश चंद्रकांत सुर्वे असे मृत वृद्धाचे नाव असून, ते धामनंद येथील एस.टी. स्टँडजवळ राहत होते.

बुधवारी पहाटे ही घटना पोलिसांच्या निदर्शनास आली. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (१० जून) दुपारी १२.३० ते ४.३० च्या दरम्यान ही घटना घडली. महेश सुर्वे हे घरातून बाहेर पडले होते.

त्यांचा मुलगा सातबारा आणण्यासाठी तलाठी कार्यालयात गेला होता. घरी परतल्यावर महेश सुर्वे दिसून न आल्याने कुटुंबियांनी त्यांचा शोध सुरू केला. घराच्या मागील बाजूस असलेल्या नदीकडे गेले असावेत, असा विचार करून शोध घेतला असता, नदीच्या डोहाच्या किनारी ते पाण्यावर तरंगताना आढळून आले.

या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. बुधवारी रात्री २.२५ वाजता या घटनेची नोंद घेण्यात आली आहे. खेड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *