Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

दापोली : लोकसाधना संस्थेचा 44 वा वर्धापनदिन उत्साहात, शिक्षण, संस्कार आणि कौशल्य विकासाच्या कार्याचा गौरव

banner 468x60

लोकसाधना संस्थेचा 44 वा वर्धापनदिन सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण, प्रेरणादायी आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद रत्नागिरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना वैदेही रानडे म्हणाल्या, “आपण ज्या समाजातून येतो, त्या समाजाचे आणि आपल्या संस्कृतीचे आपण देणे लागतो. लोकसाधना संस्थेत कौशल्य विकासाच्या माध्यमातून हे कार्य प्रभावीपणे घडताना दिसते,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

कार्यक्रमाचे मान्यवर अतिथी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) दीपक मेंगाणे यांनी, “लोकसाधना ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून शिक्षणाचे दूरदृष्टीपूर्ण व्हिजन जपणारी आणि जीवन अधिक सुंदर बनवणारी संस्था आहे. येथे कार्य करणारे प्रत्येक जण भाग्यवान आहेत,” असे मत व्यक्त केले.

याप्रसंगी उपशिक्षण अधिकारी (माध्यमिक) संदेश कडव, गटविकास अधिकारी मंडलिक, गटशिक्षण अधिकारी सांगडे यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली.

संस्थेचे माजी अध्यक्ष राजा दांडेकर तसेच अध्यक्ष ॲड. कैवल्य दांडेकर यांनी आपल्या मार्गदर्शनातून लोकसाधना संस्थेच्या चार दशकांहून अधिक काळाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि ग्रामीण विकासातील उल्लेखनीय कार्याचा आढावा घेतला. आगामी काळातही गुणवत्तापूर्ण शिक्षण, संस्कार आणि समाजाभिमुख उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी, विश्वस्त, कार्यकर्ते, माजी विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्यामुळे ४४ वा वर्धापनदिन सोहळा यशस्वी, संस्मरणीय आणि प्रेरणादायी ठरला. उपस्थित मान्यवरांनी लोकसाधना संस्थेच्या कार्याचे मनापासून कौतुक करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *