चिपळूण : 28 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

banner 468x60

चिपळूण शहरातील बेदरकर आळी येथील देसाई इन्क्युव्ह बिल्डिंगमधील एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये मंगळवारी सकाळी एका २८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. सनीशकुमार विरेद्रकुमार शर्मा असे या तरुणाचे नाव असून तो गवंडीकाम करत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सनीशकुमार हा बेदरकर आळीतील एका फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होता. मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास त्याचा भाचा त्याला भेटण्यासाठी गेला असता, सनीशकुमार हॉलमधील पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला.

तात्काळ पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सनीशकुमारला खाली उतरवले आणि उपजिल्हा रुग्णालय कामथे येथे नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.

सनीशकुमारने आत्महत्या का केली, याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *