Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

दापोली : नाट्यगृहासाठी ₹15 कोटींचा निधी मंजूर, योगेश कदम यांच्या पाठपुराव्याला यश, राज्य शासनाकडून ₹15 कोटींची मंजुरी

banner 468x60

दापोली शहराच्या सांस्कृतिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा निर्णय राज्य शासनाने घेतला असून दापोली नगरपंचायतीच्या नाट्यगृह उभारणीसाठी ₹15 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. शिवसेना नेते रामदास कदम आणि राज्याचे गृहराज्यमंत्री तथा दापोलीचे आमदार योगेश कदम यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून, उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पाळत हा निधी मंजूर केला आहे.

दापोली नगरपंचायत स्थापन झाल्यापासून शहरातील गाडीतळ परिसरात नाट्यगृह उभारण्याची मागणी सातत्याने होत होती. मंजूर विकास आराखड्यातही या जागेवर नाट्यगृहासाठी आरक्षण ठेवण्यात आले होते. अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर आता या मागणीला मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे.

दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा कृपा शशांक घाग यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, रामदास कदम यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला, रविवारी सायंकाळी नाट्यगृहासाठी ₹15 कोटी निधी मंजूर झाल्याचे पत्र नगरपंचायतीला प्राप्त झाले.

खेड येथील मीनाताई नाट्यगृहाच्या नूतनीकरण उद्घाटन कार्यक्रमात रामदास कदम यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दापोलीसाठी नाट्यगृहाच्या निधीची मागणी केली होती. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी “दापोलीला नाट्यगृहासाठी ₹15 कोटी देऊ” असे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता करत राज्य शासनाने हा निधी मंजूर केला आहे.

राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने 24 जुलै 2026 रोजी यासंदर्भातील शासन निर्णय (GR) जारी केला आहे. “नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान” या योजनेअंतर्गत हा निधी मंजूर करण्यात आला असून, नाट्यगृह उभारणीच्या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च राज्य शासनाकडून केला जाणार आहे. प्रकल्पाची अंमलबजावणी दापोली नगरपंचायतीमार्फत होणार असून आवश्यक तांत्रिक व प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात केली जाईल.

दापोली शहरातील गाडीतळ परिसरातील जुन्या धर्मशाळेच्या जागेवर व्यापारी संकुलासह आधुनिक नाट्यगृह उभारण्यात येणार आहे. या नाट्यगृहामुळे तालुक्यातील कलाकार, नाट्यसंस्था, साहित्यिक, सांस्कृतिक संघटना आणि विविध सामाजिक संस्थांना दर्जेदार व सुसज्ज व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

या निर्णयामुळे दापोलीच्या सांस्कृतिक चळवळीला नवी ऊर्जा मिळणार असून कला, नाट्य आणि साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी राज्य शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच गृहराज्यमंत्री योगेश कदम, शिवसेना नेते रामदास कदम आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याप्रती सांस्कृतिक क्षेत्रातून कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *