Breaking News
दापोली : कामगार बेपत्ता, तब्येत बिघडल्याचे सांगून गावी निघाल्यानंतर संपर्क तुटला, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा रत्नागिरी : मिरकरवाडा जेटीवर मच्छी खरेदी करण्याच्या कारणावरून सप्लायरला मारहाण, लोखंडी फायटरने हल्ला, चाकूनेही वाराचा प्रयत्न रत्नागिरी : जैतापूर समुद्रात मासेमारी करताना खलाशाला समुद्री सापाचा दंश, जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू लांजा : पहाटे महामार्गालगत संशयास्पद वावर, रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला लांजा पोलिसांनी घेतले ताब्यात दाभोळ : अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांची दादरमध्ये भव्य सभा, वणौशी, दुमदेव, भिवबंदरचे ग्रामस्थ एकवटले, आरपारच्या लढ्याचा निर्धार, ‘जमीन आमची, निर्णयही आमचा’ म्हणत प्रकल्पाला विरोध
Kokan  

रत्नागिरी : जैतापूर समुद्रात मासेमारी करताना खलाशाला समुद्री सापाचा दंश, जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

banner 468x60

रत्नागिरी तालुक्यातील जैतापूरनजीक समुद्रात बोटीवर मासेमारी करत असताना एका ४८ वर्षीय खलाशाला समुद्री सापाने दंश केल्याची घटना ३० सप्टेंबर रोजी सकाळी घडली. सर्पदंश झाल्यानंतर त्याला तातडीने प्राथमिक उपचार देऊन पुढील उपचारांसाठी रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले असून, सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

संदेश मादू राणजे (वय ४८, रा. कलासरी-वरचापाडा, जि. पालघर) असे समुद्री सापाच्या दंशामुळे जखमी झालेल्या खलाशाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ३० सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास संदेश राणजे हे जैतापूरनजीक समुद्रात बोटीवर मासेमारीचे काम करत होते. मासेमारी सुरू असतानाच अचानक एका समुद्री सापाने त्यांना दंश केला.

समुद्रातच सर्पदंश झाल्याने बोटीवरील सहकाऱ्यांनी तातडीने त्यांना उपचारासाठी किनाऱ्यावर आणले. त्यानंतर संदेश राणजे यांना जैतापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.

मात्र सर्पदंश झाल्याने पुढील वैद्यकीय उपचारांची आवश्यकता लक्षात घेऊन त्यांना रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या संदेश राणजे यांच्यावर जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.

दरम्यान, या घटनेची रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील पोलीस चौकीत रीतसर नोंद करण्यात आली आहे. समुद्रात मासेमारी करताना घडलेल्या या अनपेक्षित घटनेमुळे खलाशांमध्येही चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *