लांजा शहरातील मुंबई-गोवा महामार्गालगत पहाटेच्या अंधारात संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराला लांजा पोलिसांनी गस्तीदरम्यान ताब्यात घेतले. चोरीच्या उद्देशाने तो परिसरात फिरत असल्याचा पोलिसांना संशय आल्याने त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
अनंत राजाराम रेवाळे (वय ३५, रा. गवाणे, ता. लांजा) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास लांजा पोलीस ठाण्याचे पथक शहर परिसरात नियमित गस्त घालत होते. यावेळी पहाटे सुमारे ३.५० वाजण्याच्या सुमारास लांजा बाजारपेठेतील कोत्रे हॉटेलजवळ, मुंबई-गोवा महामार्गालगत गॉडेसखल रोड परिसरात एक व्यक्ती संशयास्पद हालचाली करताना पोलिसांच्या निदर्शनास आली.
पोलिसांनी तत्काळ त्याला अडवून त्याच्याकडे चौकशी केली. चौकशीदरम्यान त्याचे नाव अनंत रेवाळे असल्याचे निष्पन्न झाले. तसेच तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील चोरीच्या गुन्ह्यांमधील आरोपी असल्याचे समोर आले.
पहाटेच्या वेळी परिसरात संशयास्पदरीत्या वावरत असल्याने पोलिसांचा त्याच्यावरील संशय अधिक बळावला. सूर्यास्त ते सूर्योदय या कालावधीत चोरी करण्याच्या उद्देशाने तो परिसरात दबा धरून फिरत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई नितेश नवनाथ राणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनंत रेवाळे याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १२२ (ड) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दरम्यान, पहाटेच्या वेळी महामार्गालगत तसेच बाजारपेठ परिसरात संशयास्पद व्यक्तींच्या हालचाली आढळून आल्यास नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लांजा पोलीस करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













