दापोली : उबाठा गटातील कार्यकर्त्यांचा मंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश

banner 468x60

दापोली मतदारसंघातील बिजघर (सुतारवाडी), आपटी आणि तळघर (दंडवाडी) येथील असंख्य ग्रामस्थ तसेच उबाठा गटातील कार्यकर्त्यांनी १७ सप्टेंबर २०२६ रोजी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांच्या मार्गदर्शनावर आणि मंत्री योगेश कदम यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास व्यक्त करत या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे सांगण्यात आले.
प्रवेशावेळी मंत्री योगेश कदम यांनी उपस्थित ग्रामस्थ व कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या अपेक्षा, विविध प्रश्न तसेच स्थानिक विषय जाणून घेतले. जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत शिवसेनेच्या माध्यमातून जनसेवेचा प्रवास अधिक व्यापक आणि प्रभावी करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी शिवसेना परिवारात नव्याने सहभागी झालेल्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत करून त्यांच्या पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी मंत्री योगेश कदम यांनी शुभेच्छा दिल्या. या प्रवेशामुळे दापोली मतदारसंघातील संबंधित गावांमध्ये शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढण्यास मदत होणार असल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *