Breaking News
रत्नागिरी : पत्रकारांना धमकी प्रकरण : खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कारवाईची मागणी, मराठी पत्रकार परिषदेचे पोलीस अधीक्षकांना निवेदन, मुजोर आणि गावगुंडाप्रमाणे शिवीगाळ करणाऱ्या खासदाराचा कोकण कट्टा न्यूजकडूनही निषेध दाभोळमध्ये ‘कै. डॉ. मधुकर भिकाजी लुकतुके रुग्णोपयोगी साहित्य केंद्राचं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते लोकार्पण, गरजू रुग्णांसाठी ठरणार आधारवड चिपळूणमध्ये बेकायदेशीर गुटखा विक्रीविरोधात कारवाईची मागणी गुहागर युवासेना अधिकारी इम्रान घारे यांचा पदाचा राजीनामा, कार्यकर्ता म्हणून राहणार सक्रिय चिपळूण : डिलिव्हरी कंपनीची फ्रँचायझी देण्याच्या आमिषाने चिपळूणच्या व्यावसायिकाची ₹10.20 लाखांची ऑनलाइन फसवणूक

खेड : वडिलांना घेवून दुचाकीवरुन निघाला आणि टेम्पोला धडकला; तरुण जागीच ठार

banner 468x60

खेड : वडिलांना घेवून दुचाकीवरुन निघाला आणि टेम्पोला धडकला; तरुण जागीच ठार टेम्पो आणि दुचाकी यांच्यात झालेल्या धडकेत दुचाकी चालक तरुणाचा जागीच मृत्यू झाला. खेड तालुक्यातील धामणी येथे मंडणगड मार्गावर मंगळवारी (२५ जुलै) सायंकाळी हा अपघात झाला. रोहित राजेंद्र बिरवटकर (२१, रा. पोयनार आलाटीवाडी, ता. खेड) असे त्याचे नाव आहे. मंडणगड येथून सिमेंट उतरवून टेम्पो (एमएच ०४, केएफ ९८६५) खेडच्या दिशेने येत हाेता. त्याचवेळी रोहित बिरवटकर दुचाकीवरुन खेडहून पालगडच्या दिशेने जात हाेता. धामणी येथे रोहितच्या दुचाकीने टेम्पोच्या उजव्या बाजूला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, डोक्याला गंभीर दुखापत होऊन रोहीत जागीच ठार झाला. दुचाकीवर मागे बसलेले त्याचे वडील राजेंद्र बिरवटकर जखमी झाले. कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अधिक तपास खेड पोलिस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *