खेड येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कळबणी बुद्रुक गावातील हॅपी सिंग यांच्या धाब्याजवळ भरधाव वेगातील दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात गणेश वजरा (वय २६, रा. कळबणी बुद्रुक, ता. खेड, जि. रत्नागिरी) हा तरुण गंभीर जखमी झाला.
गणेश वजरा हा एमएच ०८ झेड १३६७ क्रमांकाच्या दुचाकीवरून कळबणी बुद्रुक येथून खेडच्या दिशेने जात असताना बुधवारी (दि. २३ सप्टेंबर २०२६) रात्री सुमारे ९.५० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. भरधाव वेगामुळे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच भरणा नाका येथील पुलाखाली उभी असलेल्या नरेंद्राचार्य नाणीजधामच्या २४ तास रुग्णवाहिकेचे चालक सुरेश हंबीर यांनी तत्काळ रुग्णवाहिका घटनास्थळी नेली. त्यांनी जखमी गणेश वजरा याला उपचारासाठी कळबणी बुद्रुक येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गणेश वजरा याच्यावर उपचार सुरू केले असून, त्याला औषधोपचार देण्यात येत आहेत. या अपघाताचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













