Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

गणपतीपुळे : बुडालेला पेण मधील तरुण अद्यापही बेपत्ता

banner 468x60

रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी कुटुंबासह पेण-रायगड येथून आलेल्या पर्यटकातील तरुण अद्याप बेपत्ताच. पोलिस, जीवरक्षक व स्थानिकांकडून त्यांचा शोध सुरु आहे. नितीन शंकर पवार (वय ३५, रा. हमरापूर-पेण, जि. रायगड) असे गणपतीपुळे समुद्रात बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता.

२५) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली होती. मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी रायगड-पेण मधून पर्यटनासाठी गणपतीपुळे येथे आले होते. हे कुटुंब समुद्राच्या पाण्यात आंघोळीसाठी उतरले होते. हे पिता-पुत्र बुडत असल्याचे लक्षात येताच अडीच वर्षाचा मुलगा- अयांश नितीन पवार याला फोटोग्राफर रोहित चव्हाण यानी वाचविले होते. मात्र त्याचे वडिल नितीन पवार हे समुद्राच्या पाण्यात बेपत्ता झाले. अयांश याला वाचविल्यानंतर पर्यटनासाठी आलेल्या डॉ. प्रणाली हरदारे (भिवशी-निपाणी) यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले व गणपतीपुळे येथील खासगी रिक्षाने ताबडतोब मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेण्यात आले.

तेथील वैद्यकीय अधिकारी पवार यांनी तत्काळ त्याच्यावर उपचार करुन त्याची प्रकृती स्थिर करण्याचे काम केले व अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात आणले होते. त्याची प्रकृती स्थिर आहे. या बाबत अधिक तपास जयगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय पाटील व त्यांचे सहकारी तसेच गणपतीपुळे जीवरक्षक व्यावसायिक, ग्रामस्थ व पोलिस कर्मचारी शोध घेत आहेत. मात्र पाच दिवस उलटून गेले अद्यापही पर्यटक बेपत्ता नितीन पवार यांचा शोध सुरुच आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *