रत्नागिरी : मस्करीची कुस्करी ! मित्रावर चाकूने सपासप वार

banner 468x60

रत्नागिरी तालुक्यातील गावडे आंबेरे सांडमवाडी येथे मस्करीतून मित्रावर धारदार चाकूने सपासप वार केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना सोमवारी दुपारी २.३०. च्या सुमारास घडली.

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या 

पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा 

https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy

YouTube : https://youtube.com/@kokankattalive3128?si=UdAkXVJPt9X47lwE

👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर  संपर्क करा 9960151909

या घटनेत गंभीर जखमी झालेल्या प्रथमेश मंदार तिवरेकर ( 23. राहणार गावडे आंबेरे सांडमवाडी ) याला उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अक्षय अशोक हळदणकर (वय- 25, राहणार गावडे आंबेरे सांडवाडी ) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी त्याच्यावर पूर्णगड सागरी पोलीस ठाण्यात पुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रथमेश तिवरेकर ,अक्षय हळदणकर,राज तिवरेकर,ओंकार तीवरेकर हे नातेवाईकाला पाहण्यासाठी रत्नागिरीतील एका खाजगी रुग्णालयात आले होते.

त्यानंतर त्यांनी कोकण नगर येथे एकत्र चायनीज खाल्ले त्यानंतर ते सर्व गावडे आंबेरे येथील घरी जाण्यासाठी निघाले रात्री २ वाजण्याच्या सुमारास गावडे अंबरे येथे आले असता ओंकार तीवरेकर व अक्षय हळदणकर यांच्यात मस्करी वरून वाद निर्माण झाला.दोघांमध्ये झालेला वाद प्रथमेश व राज तिवरेकर यांनी मध्यस्थी करून सोडवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *