Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

दापोली : गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

banner 468x60

दापोली तालुक्यातील आसूद गुरववाडी येथे ६ नोव्हेंबर रोजी एका २७ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. ललित विकास गुरव असे त्यांचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विलास गुरव यांचे आसूद येथे नवीन घर बांधण्याचे काम सुरू असून ते पूर्णत्वास आले आहे, मात्र त्यावर अद्याप पत्रा टाकलेला नाही. विलास यांचा मुलगा ललित गुरव याला दारूचे व्यसन होते.

दारूच्या नशेत ललितने नवीन बांधकाम सुरू असलेल्या घराच्या किचनमधील पडवीतील लोखंडी अँगलला नायलॉन साडीने गळफास लावून घेतला. दुपारी २:३० ते ४:३० या वेळेत ही घटना घडली. घरातील सदस्यांनी त्याला तात्काळ उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे रुग्णवाहिकेच्या सहाय्याने दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्याला तपासून मयत घोषित केले. या घटनेची नोंद दापोली पोलीस स्थानकात अकस्मित मृत्यू म्हणून करण्यात आली असून, दापोली पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *