Breaking News
रत्नागिरी : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची चौथ्या मजल्यावरून उडी, पतीसह सासरच्या पाच जणांवर गुन्हा, ‘माहेरून फ्लॅट घेण्यासाठी पैसे आणावेत, अन्यथा मुलाचा दुसरा विवाह करून देऊ’, मुलांपासून दूर ठेवल्याचा तक्रारीत आरोप; पाच सागरी जिल्ह्यांतील भूमिपुत्रांची एकजूट, ‘सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना रत्नागिरी : ज्येष्ठ पत्रकार जावेद मुजावर यांचे निधन,पत्रकारिता, सहकार क्षेत्रात हळहळ धक्कादायक खेडमध्ये दोन तरुण बेपत्ता, अपहरणाचा संशय, अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल दाभोळ : आघारीत 54 वर्षीय व्यक्तीचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू, भुंडावड परिसरात आढळले होते बेशुद्ध

राज्यात पुढील चार दिवस वादळी पावसाचा इशारा, हवामान खात्याकडून यलो अलर्ट जारी

banner 468x60

देशाच्या अनेक भागांत उष्णतेची लाट पसरलेली असतानाच महाराष्ट्रात मात्र वातावरणात मोठा बदल झाला आहे. राज्यातील बहुतांश भागात पुढील चार दिवस वादळी पावसाची शक्यता असून हवामान खात्याने यासंदर्भात यलो अलर्ट जारी केला आहे.


गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या काही भागांत उष्णतेच्या लाटेसह अवकाळी पावसाने हजेरी लावली असून रविवारी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाची नोंद झाली आहे.


सोमवारपासून राज्यातील उष्णतेची लाट ओसरणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून कोकणपासून विदर्भापर्यंत अनेक जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार आहे.

हवामान विभागाने गुरुवारपर्यंत हा इशारा दिला असून नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वाढत्या उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळणार असला तरी, अचानक येणाऱ्या वादळी पावसामुळे शेतीकामांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *