Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

चिपळूण : पोलीस असल्याची बतावणी करत महिलेला लुटले, दीड लाख घेऊन पळाले

banner 468x60

चिपळूणमध्ये पोलीस असल्याची बतावणी करून महिलेच्या दीड लाख रुपये किंमतीच्या पाटल्या चोरल्याची घटना ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.५० वा. शहरातील राधाकृष्णनगर येथे घडली.

या प्रकरणी दोघा अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित महिला येथील मुत्तपन मंदिरासमोर नवरात्रोत्सवानिमित्त स्थानापन्न देवीच्या समोरील बाकावर थोडा वेळ बसून नंतर देवीच्या पाया पडून घरी जात असताना दुचाकीवरुन आलेल्या 2 अंज्ञात चोरट्यांनी तिला आपण

पोलीस असल्याचे सांगून तिच्या हातातील दीड लाख रूपये किंमतीच्या सोन्याच्या पाटल्या (बांगड्या) काढून घेत पलायन केले.

त्यातील एकाने अंगात हिरव्या रंगाचा चेक्स शर्ट व काळी पॅन्ट घातली होती. त्याच्या खांद्याला छोटी बॅग होती, तर दुसऱ्याने सफेद रंगाचा शर्ट घातला होता.

या महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, अज्ञात चोरट्यांवर भादंवि कलम अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *