Breaking News
चिपळूण : सावर्डेतील 13 वर्षीय अपहरण झालेल्या मुलीचा मुंबईत शोध, संबंधित युवक पोलिसांच्या ताब्यात, चार दिवसांच्या शोधमोहिमेनंतर रत्नागिरी पोलिसांना यश; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची विशेष पथके मुंबईत दाखल, मुलगी सुरक्षित रत्नागिरी : रस्त्यावर फिट आल्याने 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू, उपचारादरम्यान सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्राणज्योत मालवली संगमेश्वर : मार्लेश्वर दर्शनाला आलेल्या सहा वर्षीय चिमुकलीचा दगड डोक्यात पडून मृत्यू, दोघे जखमी रत्नागिरी : डायलिसिस सेवा बंद करण्याचा प्रयत्न केल्यास कंपनीवर कारवाई करणार उदय सामंतांचा इशारा, रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही डायलिसिस केंद्रे सुरू राहणार चिपळूण : प्रशांत यादव यांच्या ‘स्वामिनी’ निवासस्थानी भाजपचा दिवाळी स्नेहमेळावा, पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठी उपस्थितीखेर्डी येथे दिवाळी फराळाचे आयोजन, स्नेहबंध दृढ करत अनौपचारिक संवादातून साधला संवाद

दापोली : घरात कामाला येणाऱ्या महिलेवर चोरीचा आरोप, 98 हजारांचे दागिने आणि रोकड लंपास

banner 468x60

दापोली तालुक्यातील जालगाव येथील विद्यानगर परिसरात घरात स्वयंपाक करण्यासाठी येणाऱ्या महिलेने मालकाच्या घरातून सुमारे ९८ हजार २८२ रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड चोरल्याची तक्रार दापोली पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी महिलेविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २१ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजण्यापूर्वी जालगाव, विद्यानगर येथील फिर्यादी रविंद्र गंगाराम क्षिरसागर (वय ६२) यांच्या राहत्या घरात घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

फिर्यादी यांच्या घरी स्वयंपाक करण्यासाठी येणाऱ्या उषा विकास सर्वे (वय ४३) यांनी स्वतःच्या फायद्यासाठी लबाडीच्या उद्देशाने घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

चोरीस गेलेल्या वस्तूंमध्ये तीन चांदीची निरांजने, एक चांदीची वाटी आणि एक चांदीचा करंडा, तसेच सोन्याचे लहान मुलांच्या हातातील ब्रेसलेट व सटवी यांचा समावेश आहे. याशिवाय ५०० रुपये रोख रक्कम चोरीस गेल्याचे तक्रारीत नमूद आहे.

चोरीस गेलेल्या मालमत्तेचे एकूण मूल्य ९८ हजार २८२ रुपये असल्याचे पोलिस नोंदीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी २८ सप्टेंबर रोजी रात्री ८.१० वाजता दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. आरोपी महिलेवरील आरोप हे तक्रारीवर आधारित असून, प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *