दापोली : जालगाव चैतन्य नगरमध्ये घरात पाणी, संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान

banner 468x60

दापोली तालुक्यात सलग चौथ्या दिवशी सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज 5 जुलै रविवारी जालगाव येथील चैतन्य नगर परिसरात पावसाचे पाणी घरांमध्ये शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे.

चैतन्य नगर येथील रहिवासी संतोष सागवेकर यांच्या घरात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे घरातील फर्निचर, इलेक्ट्रिक उपकरणे तसेच इतर संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. अचानक घरात पाणी शिरल्याने कुटुंबीयांची एकच धावपळ उडाली.

गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दापोली शहर व तालुक्यातील अनेक सखल भाग जलमय झाले असून, नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाचा जोर कायम असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *