मंडणगड शहरातील अनेक वर्षांपासूनची पाणीटंचाईची समस्या आता दूर होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. केंद्र सरकारच्या अमृत २.० योजनेअंतर्गत ‘मंडणगड नगरपंचायत पाणीपुरवठा योजनेला’ अखेर मंजुरी मिळाली आहे.
या योजनेमुळे शहरातील नागरिकांना शुद्ध, सुरक्षित आणि पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध होणार असून, उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा निघण्याची अपेक्षा आहे.
योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये:
शाश्वत पाणीपुरवठा व्यवस्था: उन्हाळ्यातील पाणी संकटावर मात करण्यासाठी नियोजन.
शुद्ध पाण्याची उपलब्धता: नागरिकांना प्रक्रिया केलेले सुरक्षित पाणी मिळणार.
भविष्यातील गरजांचा विचार: वाढत्या लोकसंख्येनुसार योजनेची आखणी.
घरोघरी नळ जोडणी: प्रत्येक कुटुंबापर्यंत पाणी पोहोचवण्याचे उद्दिष्ट.
या योजनेमुळे नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार असून, विशेषतः महिलांची पाण्यासाठी होणारी पायपीट कमी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
या योजनेला मंजुरी मिळवून देण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल खासदार सुनील तटकरे यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
उपनगराध्यक्ष व शहराध्यक्ष मंडणगड वैभव राम कोकाटे यांनी नगराध्यक्ष सोनल बेर्डे, पाणीपुरवठा सभापती मनीषा हातमकर, माजी पाणीपुरवठा सभापती सुभाष सापटे, बांधकाम सभापती राजश्री सापटे, महिला व बालकल्याण समिती सभापती समृद्धी शिगवण, मागासवर्गीय कल्याण सभापती रेश्मा मर्चंडे, नगरसेवक, स्वीकृत नगरसेवक, तालुका व शहर पदाधिकारी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे सहकार्याबद्दल आभार मानले आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













