दापोली : श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने शिरसोली-शिर्सेश्वर येथे विविध समाजोपयोगी उपक्रम

banner 468x60

श्री स्वराज्य प्रतिष्ठान, दापोलीच्या वतीने शिरसोली-शिर्सेश्वर येथे विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले. प्रतिष्ठानचा हा पहिलाच समाजोपयोगी उपक्रम असून, संस्थापक अध्यक्ष बी. आर. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण, पर्यावरण संवर्धन आणि विद्यार्थ्यांच्या गुणगौरवाचे विविध उपक्रम यावेळी राबविण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले ते आदर्श जिल्हा परिषद शाळा म्हणून पुरस्कार प्राप्त ‘पूर्ण प्राथमिक मराठी शाळा शिरसोली नं. १’च्या विशेष सत्काराचे. शाळेने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रतिष्ठानच्या वतीने शाळेचा गौरव करण्यात आला.

banner 728x90

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी शाळेच्या परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले. पर्यावरणाचे महत्त्व आणि वृक्षसंवर्धनाची गरज याबाबत उपस्थितांना संदेश देत विद्यार्थ्यांनीही या उपक्रमात सहभाग घेतला.

यावेळी अंगणवाडी शिर्सेश्वर येथील विद्यार्थ्यांना शालेय तसेच दैनंदिन उपयोगाच्या वस्तूंचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याच्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.

तसेच राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा (NMMS) मध्ये उल्लेखनीय यश मिळवून शिष्यवृत्ती संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थी पार्थ सुनील जाधव याचा विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम महत्त्वाचे असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले.

या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक नांदगावकर सर, शिक्षक विजय फंड सर, तांबिटकर गुरुजी, कालेकर गुरुजी, अंगणवाडी सेविका वैभवी मोरे यांच्यासह प्रतिष्ठित ग्रामस्थ गणू भावे, सुनील जाधव, अरविंद जाधव, संतोष जाधव, सिद्धार्थ महाडिक, रवींद्र जाधव, कोंडीबा जाधव, शालेय कमिटी अध्यक्ष विवेक भावे तसेच शंकर पार्वती ट्रस्टचे ट्रस्टी सुरेश जाधव उपस्थित होते.

प्रतिष्ठानच्या वतीने उपाध्यक्ष सुधीर जाधव, खजिनदार अमर मोरे, सहखजिनदार विशाल रेवाळे, सल्लागार दीपक जाधव, सदस्य राजीव पिंपळे, संदीप महादवे, दीपक मोरे, परेश घाग, मानस मोरे, कुणाल शिगवण, प्रवीण ढगे, संतोष जाधव, नंदकिशोर पाताडे यांच्यासह प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिष्ठानचे सचिव, लेखक व कवी जयवंत चव्हाण यांनी प्रभावीपणे केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रतिष्ठानच्या पदाधिकारी व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.

शिक्षणाला प्रोत्साहन, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात आले. श्री स्वराज्य प्रतिष्ठान, दापोलीच्या या स्तुत्य समाजोपयोगी उपक्रमाचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *